Manohar Joshi । बिग ब्रेकिंग! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये दाखल

Manohar Joshi

Manohar Joshi । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. याआधीही शिवसेना नेते मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजमुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Manoj Jarange । “मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे” महिलेचे गंभीर आरोप

गेल्या वर्षी मे महिन्यात ८६ वर्षीय ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले. मात्र, काही दिवसांत त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

Manoj Jarange Patil । आंदोलनातील महिलेचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप!

माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानले जायचे. ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप

Spread the love