Maratha Reservation । मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Reservation of Maratha community) पेच अजूनही सुटला नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु होते. परंतु राज्य सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी तात्पुरतं आंदोलन मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. ते येत्या १४ ऑक्टोबर रोजी मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत. (Latest Marathi News)
अशातच आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी १३ जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाणार?
या जिल्ह्यात करणार दौरे
दरम्यान, मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार असून नंतर मराठवाड्याबाहेर नगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा पहिला थांबा परभणीच्या जिंतूर येथे होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.