Manoj Jarange । बिग ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Manoj Jarange

Manoj Jarange । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागच्या १६ दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण जरांगे पाटील यांनी स्थगित केल्याची माहिती मिळत आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणहून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Viral Video । ट्रेनमध्ये पैसे न दिल्याने किन्नरांनी केली लोकांना मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर

यावेळी जरांगे पाटील यांनी मोठा दावा देखील केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागच्या वेळेसारखी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी सारखी या ठिकाणी लाठीचार्जची घटना घडवून आणायची होती. मात्र मी तसं घडण्यापासून वाचवलं असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

Ketki Chitle । मनोज जरांगेंचे फडणवीसांवर आरोप; केतकी चितळे म्हणाली, “एका मोर्चा धारक…”

त्याचबरोबर, पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “पोलीस बाजूला सारावेत, आणि सागरचा दरवाजा उघडावा मी कधीही कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी यायला तयार आहे. तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. काल जे वर्तन केले ते चांगले नव्हे. तुम्ही चित्र बदलावं असं देखील जरांगे पाटलांनी भर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Ajay Baraskar । फडणवीसांसोबतच्या फोटोवर अजय बारसकरांच दिल स्पष्टीकरण

Spread the love