
Manoj Jarange । महाराष्ट्रात एकीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावागावात जाऊन आंदोलन आणि जाहीर सभा घेणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी फडणवीसांणबाबत मोठा खुलासा केला आहे.
Kangana Ranaut | ब्रेकिंग! “…ते सहन करू शकत नाही” अभिनेत्री कंगनाला बसला मोठा धक्का
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पहाटे तीन वाजता फोन केला होता. एवढेच नाही तर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. मात्र मी शांत बसणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवूनच देणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Sharad Pawar । पवार कुटुंबाच्या वादावर शरद पवारांच्या बहिणीचे सर्वात मोठे वक्तव्य!
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठा बांधवांवर देखील खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांचा एकच विचार आहे का? त्यामुळेच तर मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे देखील जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. बीड येथे सभा स्थळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
Eknath Shinde । राज्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीबाबत एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!