Manoj Jarange । मनोज जरांगे पाटील यांनी आज रात्रीपर्यंत सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला नाही तर उद्या मुंबईत येऊ असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर काही मागण्या देखील जरांगे पाटील यांनी सरकारकडे केल्या आहेत. जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या कोणत्या त्या जाणून घेऊयात..
Manoj jarange Patil । “…तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम
१) सगे-सोयऱ्यांचा अध्यादेश द्या
२) मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या
३) शिंदे समितीला वर्षभर मुदतवाढ द्या
४) आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला १००% मोफत शिक्षण मिळावं
५) मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका
६) भरती करायची असेल तर मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा
७) आजच्या रात्रीत सगे-सोयरेचा अध्यादेश द्यावा