Manoj Jarange Health । चिंताजनक बातमी! मनोज जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, प्रकृती आणखी खालावली

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Health । आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. अन्नपाणी घेण्यास नकार दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे.

Praful Patel । राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का? बड्या नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

अनेक विनंती करून देखील मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी पाणी घेण्यास नकार दिला आहे. मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यामुळे त्यांची अवस्था पाहून त्यांचे सहकारी काळजीत पडले आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावत चालली आहे. आज त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. पोटामध्ये तीव्र वेदना होत असूनही मनोज जरांगे उपचार घेण्यास सतत नकारच देत आहेत.

Electoral Bond Scheme । सर्वात मोठी बातमी! इलेक्टोरल बॉण्ड योजना घटनाबाह्य…सुप्रीम कोर्टाने निधी देण्यावरून सरकारला दिला मोठा दणका

आमरण उपोषणचा आजचा सहावा दिवस जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्या पोटात मोठ्या वेदना होत आहेत. जरांगेंनी उपचार घ्यावेत यासाठी सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपचार घेणार नाही यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

Uddhav Thackeray । राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love