Manoj Jarange Health Update । मोठी बातमी! जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, पायाला सूज, तापही भरला; माथाडी भवन येथील सभा रद्द

Manoj Jarange

Manoj Jarange Health Update । मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहोचली आहे. आज वाशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर ते आझाद मैदानाकडे रवाना होणार आहेत. मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Chandrpur News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

पदयात्रेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पायाला सूज आली असून त्यांना सकाळपासून ताप देखील आला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन या ठिकाणी होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. जरांगे पाटील सध्या एपीएमसी मार्केट मधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करत आहेत.

Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…

सकाळी ९ वाजता जरांगे पाटील वाशी या ठिकाणी शिवाजी चौकात येऊन त्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आज आरक्षणाबाबत काय तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil । जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

Spread the love