Manoj Jarange । मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोर संतापले, नेमकं काय घडलं बैठकीत?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange । मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे मराठा बांधव आता आक्रमक झाले आहेत. दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपसमितीसह मराठा नेते मनोज रजरांगे पाटील यांच्याशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती मिळाली.

Shirdi News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर १० ते १२ जणांनी केला प्राणघातक हल्ला; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची सर्व भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतःची देखील भूमिका मांडली आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची देखील आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर आपले सगळे सगे-सोयरे शब्दांचा सरकारने चुकीचा अर्थ काढला अस देखील मनोज जरांगे यांनी सांगितल आहे.

Payment Apps । ‘या’ वापरकर्त्यांची Google Pay, Paytm, Phonepe अकाऊंट होणार बंद, जाणून घ्या यामागचं कारण

त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधताना काही जातीयवादी अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याची तक्रार देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे अजून एकही मागे घेण्यात आले नाहीत. याबाबत देखील मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या बैठकीमध्ये विचारलं.

Washing Machines । स्वस्तात खरेदी करा या वॉशिंग मशीन, कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे निर्दोष आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर मनोज जरांगे म्हणाले गुन्हे मागे घेण्यासाठी दोन-तीन महिने थोडी लागतील? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Pune Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलं भयानक; वाचून हादराल

त्याचबरोबर एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, काही जणांचे स्टेटमेंट नोंदवले जात आहे. प्रक्रिया सुरू आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, दोन-तीन महिने स्टेटमेंट लिहायला लागतात का? असा मोठा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी एका प्रक्रियेनुसार हे काम करावं लागतं असं सांगितलं. मात्र त्या प्रक्रियेला चार महिने लागत नाहीत असे देखील मनोज जररांगे पाटील म्हणाले आहेत.

Viral Video । लग्नाच्या पहिल्या रात्री कपलचा रोमान्स, स्वतः शेअर केला व्हिडिओ, लोक म्हणाले..

Spread the love