Manoj Jarange । शरद पवार सांगतात तसेच मनोज जरांगे पाटील करतात. शरद पवार (Sharad Pawar) यांचाच फोन जरांगे पाटील यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीच लावले होते. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत. असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. (Politics News )
Manoj Jarange Patil । आंदोलनातील महिलेचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप!
मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनतर आता एका महिलेने गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे. शरद पवार जसं सांगतात तसं जरांगे करतात, असा गंभीर आरोप संगीत वानखेडेंनी केला आहे.
Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप
त्याचबरोबर पुढे बोलताना संगीता वानखेडे म्हणाल्या, “मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना जरांगे विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता असं संगीता वानखडे म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता सगळीकडे याचीच चर्चा होत आहे.
Sanjay Raut । “…म्हणून पवारांचे घड्याळ काढून घेतलं” नेमकं काय म्हणाले संजय राऊत?