
Manoj Jarange । मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचा अत्यंत जवळचा मित्र अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी गंभीर आरोप केले. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. दरम्यान आता या सर्व आरोपांवर मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, त्याचबरोबर जरांगेंच्या आंदोलनाला पैसे येतात कुठून? याची ईडीकडून चौकशी करा, अशी मागणीही बारस्कर यांनी केली. असे अनेक आरोप बारस्कर यांनी केले आहेत.
Pandharisheth Phadake | गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर!
जवळच्या मित्राने केलेल्या आरोपावर जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, जर संत तुकाराम महाराजांबद्दल मी चुकून काही वक्तव्य केले असेल तर मी त्याची माफी मागतो. पण आरोप करणाऱ्याची माफी मागत नाही. संत तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून चुकून शब्द गेले असतील, तर मी माफी मागतो. बाकी गोष्टींची माफी मागत नाही असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘संतांच्या आडून माझ्यावर आरोप करू नका, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. त्याला मला पाणी पाजून क्रेडिट घ्यायचं होतं. मात्र मला त्याला पाणी पाजून देऊन मोठं करायचं नव्हतं. तू कसला महाराज तू बांधावरून उठला आणि महाराज झाला,’ असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. त्याचबरोबर एक मोठा आरोप देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. ते म्हणाले, “शिंदे साहेबांचा एक प्रवक्ता याला मिळालेला आहे. त्याच्या माध्यमातून सरकार माझ्यावर ट्रॅप रचत आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.
Sharad Pawar । ‘या’ बड्या नेत्याला आज उद्या अटक होणार; शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य