Manoj Jarange । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावातून मुंबईकडे वाटचाल सुरू आहे. जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पाय दिंडी पुण्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. जालना, बीड आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले आहेत.
Ulhas Patil । काँग्रेसने निलंबन केल्यानंतर उल्हास पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
22 जानेवारीला जरांगे पाटील यांनी रांजणगाव गणपती या ठिकाणी मुक्काम केला. आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. आज दुपारचे भोजन भीमा कोरेगाव या ठिकाणी केले जाणार आहे. तर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदन नगर या ठिकाणी केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला जरांगे पाटील मुंबई धडकणार आहेत.
जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये अनेक मराठा बांधवांनी आंदोलनाला उपस्थित राहावे असे आव्हान देखील त्यांनी केले आहे. 26 तारखेला हे आंदोलन होणार असून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.