Manoj Jarange । मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागच्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील लढत आहेत. मात्र सध्या त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Kartik Aaryan । ब्रेकिंग! बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनवर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर
मागच्या काही दिवसापासून जरांगे पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सभा घेतल्या मात्र सध्या त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी डॉक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत.
याआधी देखील तब्येत बिघडल्यामुळे जरांगे पाटील यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Kartik Aaryan । ब्रेकिंग! बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनवर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर