Manoj Jarange । जालना येथील झालेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार विरोधात मराठा समाजाची संतापाची भावना वाढली आहे. मराठा आरक्षणावरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.चार वर्षांपासून थंडावलेले आंदोलन पुन्हा चिघळले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत म्हणून जरांगे गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले असून त्यांची आज प्रकृती खालावल्याची माहिती समोर आले आहे मात्र तरी देखील ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत.
Havaman Andaj । आनंदाची बातमी! पुन्हा मान्सून सक्रीय होणार; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
कोणत्याच परिस्थितीत उपोषण सोडणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मराठा कार्यकर्त्यांना टेन्शन आल आहे. सरकारने जरांगे पाटील यांना वाचवाव आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा असं कळकळीचा आव्हान मराठा आंदोलकांनी केल आहे.
मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलनाच्या उपोषणाला बसले असून या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्यामुळे यांची प्रकृती खालावली आहे. अंगात ताकत राहिली नाही, त्यांना अस्वस्थ वाटत आहे त्यामुळे उपोषणाच्या जागी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांच्या भोवती सर्व कार्यकर्ते देखील जमले आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळतात अनेक ठिकाणचे मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटी या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sharad Pawar । “भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होतोय” शरद पवारांचा गंभीर आरोप