Manoj Jarange । मनोज जरांगे यांचे उपोषण 10 व्या दिवशीही सुरू, मराठा आरक्षणावर सरकारला 20 फेब्रुवारीचा अल्टिमेटम

Manoj Jarange Patil

Manoj Jarange । मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आंतरवाली सराटीमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. सोमवारी (19 फेब्रुवारी) जरांगे यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Crime News । अंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार; शेवटी घडलं भयानक

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारला 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला असून या तारखेपर्यंत आपल्या समर्थकांना शांत राहण्यास सांगितले आहे.

Ajit Pawar । “पुन्हा एकदा मोदींना…”अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले असून 19 फेब्रुवारी हा त्यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून त्यांनी एक दाणाही खाल्ला नाही. सुरुवातीला त्यांनी पाणी आणि उपचार घेण्यासही नकार दिला, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. नंतर त्यांनी समाजातील सदस्य आणि काही पत्रकारांच्या विनंतीला मान्यता दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sharad Pawar । भाजप देणार शरद पवारांना जबरदस्त धक्का? विश्वासू नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचालींना वेग

Spread the love