Manoj Jarange । कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास

Manoj Jarange

Manoj Jarange । मराठा आरक्षणासाठी निघालेला मराठा मोर्चा लवकरच मुंबईमध्ये धडकणार आहे. आंदोलनामध्ये ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जोडले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाची ताकद अधिकच वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यामुळे सरकारची देखील डोकेदुखी वाढली आहे. मराठा वादळ मुंबईत धडकण्याआधीच सरकारने देखील प्रयत्न सुरू केले आहेत. मराठा बांधवांची गर्दी पाहता आज सकाळी मराठा मोर्चा लोणावळ्यात पोहचणार आहे.

Eknath Shinde । मुख्यमंत्र्यांची जरांगेंना कळकळीची विनंती; पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे 26 तारखेला आम्ही मुंबईत दाखल होणार. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार देखील आम्हाला आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Manoj Jarange Patil । मुंबई हायकोर्टाकडून नोटीस आल्यानंतर मनोज जरांगे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईत धडकणार वादळ

हे आंदोलन मुंबईत जाईपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंग होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

Manoj Jarange Patil | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून नोटीस; मुंबईतील आंदोलन फसणार?

Spread the love