
Manoj Jarange । आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी (Manoj Jarange Patil vs OBC) आमनेसामने आले आहेत. ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. अशातच आता OBC आरक्षणच (OBC reservation) रद्द होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया. (Latest marathi news)
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काढलेल्या अध्यादेशाला विरोध केला आहे. त्यावरून जरांगे पाटील देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Maratha Reservation Survey । धक्कादायक! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना केली मारहाण
“आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळ करायचं नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही. पण तो (छगन भुजबळ) जर आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळे होत असल्याचं गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला हवे. नाईलाजाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल,” असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे.