Manoj jarange patil | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पित मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे

Manoj Jarange Patil

Manoj jarange patil | मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी उपोषण केली जात आहेत. मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावी अशी विनंती अनेक वेळा राज्य सरकारने केली होती. मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची त्यांची भूमिका होती, मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics । शिंदे गट की ठाकरे गट कोणाचे आमदार अपात्र ठरणार? आज होणार सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये दहा मिनिटे चर्चा झाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी तरुण चढला थेट टॉवरवर; मुख्यमंत्र्यांना दिला गंभीर इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत आपले उपोषण मागे घेतले आहे. आपण आरक्षण मागे घ्यावे आणि सरकारला थोडा वेळ द्यावा आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आश्वासन दिले आणि म्हणून जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anil Parab । “…त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी फोडली”, अनिल परब यांच्या दाव्याने खळबळ

Spread the love