Manoj Jarange Patil । ऐन निवडणुकीच्या काळात (Loksabha election) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच राज्यातल्या राजकारणाला वेगळे वळण लागू शकते. याला कारण आहेत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील. (Loksabha election 2024)
मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. याबाबत नुकतीच जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. “जो आपल्या बाजूने उभा राहू शकतो केवळ त्यालाच मतदान करा, बाकीचे सगळे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेच्या आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत,” असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला (Maratha reservation) केले आहे. (Latest marathi news)
Patiala News । धक्कादायक घटना! ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
“मराठा समाजाच्या नादी लागायचं नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असावा. मी कोणालाही मतदान करणार नाही. राजकारणामुळे जातीचं वाटोळं करायचं नाही. आता मराठो मोकळे झाले असून आता त्यांना टेंशन आलं असेल मराठे नेमके कोणत्या उमेदवाराला पाडणार? त्यांना समजणार पण नाही, असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले आहे.
Crime News । धक्कादायक! पुण्याजवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकताच….