Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून मागच्या तीन दिवसापासून त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. त्याचबरोबर उपचार घेण्यासाठी देखील त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत खालवली आहे.
Radhakrishna Vikhe Patil । राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात मोठा धक्का
मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे. सध्या त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलन स्थळी दाखल झाले होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जरांगेंच्या या भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे.
सरकारने आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मात्र अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कोणी आलं नसल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सरकारकडून यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.