Manoj Jarange Patil । 24 तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा… मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जालन्याचे मनोज रंगे पाटील हे आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अनेक ठिकाणी सभा मनोज जरांगे घेत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. (Manoj Jarange Patil at Baramti )

Baramati News । लोकसभा निवडणुकीआधी बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली! राज ठाकरे यांच्यासोबत आले अजित पवार?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा जर येत्या 24 तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर मराठ्यांचं शांततेत सुरू असलेल आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. असा गंभीर इशारा मराठा आंदोलकी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारला दिला आहे. ते शिवनेरी किल्ल्यावरून बोलत होते.

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार! अत्यंत जवळचा नेता अजित पवारांच्या संपर्कात

दरम्यान, आज जरंगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारला हा गंभीर इशारा दिला आहे.

Supriya Sule । राजकीय घडामोडींना वेग! बारामतीतून सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार देणार टक्कर? त्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आम्ही आरक्षणासाठी ४ दिवसांचा वेळी देखील दिला होता मात्र राज्य सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला. त्यानंतर आम्ही यापुढे १० दिवसांचा वेळ वाढवून दिला असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता सरकारला दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधित निर्णय घ्यावा जर कुठलीही कुठलीही चालढकल करण्याचा प्रयत्न केला तर शांततेत होणार मराठा आंदोलन तुम्हाला पेलणार नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Urfi Javed । उर्फी जावेदला मोठी दुखापत! ‘त्या’ फोटोमुळे चाहते हैराण

Spread the love