Manoj Jarange Patil । “…त्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला”, मनोज जरांगे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

Manoj jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या महिनाभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मी पुन्हा एकदा 6 जूनपासून उपोषणाला बसेन, असे ते म्हणाले. राज्य सरकारकडून आमची दिशाभूल करण्यात आली आहे. महायुतीने आम्हाला मराठा आरक्षण दिलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. असं ते म्हणाले आहेत.

Narendra Modi | गॅस सिलेंडरबाबत नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे लोकसभा निवडणूक लढवणार?

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार (महायुती आघाडी) तसेच यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महायुती सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आरक्षणाबाबतचे महत्त्वाचे निर्णय सात महिन्यांसाठी पुढे ढकलून त्यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. (Lok Sabha Elections)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला सर्वात मोठा धक्का!

पुढे, आगामी निवडणूक लढवण्याच्या आपल्या विचाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, मराठा समजला ६ जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास ते महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवू शकतात, असे ते म्हणाले.

Lok Sabha Elections । बारामतीत निवडणुकीचे वातावरण कसे आहे? सुनेत्रा पवार म्हणाल्या- ‘माझी उमेदवारी…’

Spread the love