Manoj Jarange Patil । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धडपडणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये मागच्या काही दिवसात शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. यामध्येच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले, जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण देऊ नका म्हणत असतो, त्याचबरोबर जो व्यक्ती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाबद्दल काय बोलायचं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक. बडे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यादरम्यान मंत्री छगन भुजबळ हे देखील आज नाशिक मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध देखील दर्शवला आहे.