Manoj Jarange Patil । ‘जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही तर…’, बड्या नेत्याच्या धक्कादायक आरोपाने उडाली खळबळ

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी सरकारला गुडघ्यावर टेकवले नाही तर थांबणार नाही, असा इशारा दिला. यावर प्रतिक्रिया देताना गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, जरांगे यांना खरं तर मराठा समाजासाठी आरक्षण द्यायचं नाही, तर ते फक्त मीडियामध्ये राहण्यास उत्सुक आहेत. फुके यांनी जोरदार टीका करत सांगितले की, जरांगे यांच्या वक्तव्यांमागे त्यांच्या अहंकाराची भावना आहे.

Ajit Pawar । अनेक रंग आणि पैलूंनी सजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार मोहिम; अॅनिमेटेड व्हिडिओ, स्वाक्षरी मोहिम आणि मानवी साखळी उपक्रम ठरल्या अजित पवारांच्या प्रचार मोहिमेच्या जमेच्या बाजू

फुके यांचे म्हणणे आहे की, जरांगे हे समाजाच्या मुद्द्यांवर लढत नाहीत, तर आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी उपोषण करीत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून 10 टक्के आरक्षण दिलं आहे, जे एक मोठं पाऊल आहे. ओबीसी समाजात 353 जातींच्या आरक्षणाची स्थिती लक्षात घेता, जर मराठा समाज EWS मध्ये समाविष्ट झाला तर आरक्षण कमी होईल. परिणय फुके यांनी हे सुद्धा सांगितले की, जरांगे यांचे उपोषण आणि वक्तव्ये केवळ मीडियामध्ये राहण्यासाठी आहेत.

Delhi New CM Atishi । सर्वात मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांची निवड

त्याचबरोबर, फुके यांनी गोंदिया विधानसभेच्या जागांबाबतही स्पष्टपणे बोलले. त्यांनी सांगितले की, भाजप गोंदिया विधानसभेची जागा लढवणार आहे आणि ते ठाम आहेत की, भाजप चारही जागा जिंकेल. गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभांवर भाजपाचा दावा असून, त्यांच्याकडून एकमेकांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. फुके यांनी चेतावणी दिली की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाची रणनीती आणि कार्यपद्धती महत्वाची ठरेल.

Sameer Khan Accident । सर्वात मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात

गोंदिया जिल्ह्यात तिरोडा-गोरेगाव विधानसभेची जागा भाजपाकडे आहे, अर्जुनी मोरगावच्या जागा राष्ट्रवादीकडे असून, देवरी-आमगावच्या जागा काँग्रेसकडे आहेत. फुके यांच्या दाव्यामुळे महायुतीमध्ये चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अधिक गडबड होऊ शकते.

Bajaj Housing Finance । बजाज हाउसिंग फायनान्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा फायदा; आयपीओ लिस्टिंगनंतर पैसे दुप्पट

Spread the love