Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी अनेक महिला जमल्या असून त्यांनी उपचार घ्यावे आणि सरकारने जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी केली आहे. यामध्येच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने देखील सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का!
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, “हे सर्व जे काही घडत आहे ते नालायक सरकार मुळे घडत आहे. मला खूप भीती वाटत आहे. पप्पांना काही झालं तर ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार राहील. माझ्या पप्पांना जर काही झालं तर या सरकारचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल. असा इशाराच जरांगे पाटील यांच्या मुलीने दिला आहे.
NCP MLA Disqualification । मोठी बातमी! राष्ट्रवादी अजितदादांचीच, विधानसभा अध्यक्षांचा निकाल
त्याचबरोबर पुढे बोलताना मुलगी म्हणाली, “पप्पांना मी सांगितलं होतं उपोषण करू नका. मात्र समाजाच्या वेदना मोठ्या आहेत त्यामुळे पप्पांना उपोषण कराव लागलं.. माझ्या पप्पांना काही झालं तर सरकारला समाज उभा जाळील.. एक मुलगी बापासाठी काहीही करू शकते जर आरक्षण मिळालं नाही तर मुलगी काय करू शकते हे दिसेल. असा इशारा देखील तिने दिला आहे.
Yuvraj Pathare । मोठी बातमी! शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला