Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, मी कोणत्याही पक्षाचा नाहीये मात्र तरीदेखील मनोज जरांगे यांचा संबंध राजकीय पक्षांची लावला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांच्यावर मागच्या तीन-चार दिवसापासून गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान सध्या पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर (Baburao Walekar) यांनी त्यांच्यावर सध्या गंभीर आरोप केला आहे.
Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य
बाबुराव वाळेकर म्हणाले, “मनोज जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस असून शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. जरांगे यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले आहेत आणि यामध्येच आता बाबुराव वाळेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
बाबुराव वाळेकर यांनी गोप्यस्फोटही केला आहे. ते म्हणाले, “जरांगे पाटील यांनी महिलांना ढाल म्हणून पुढे केले. जरांगेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यांनी जिथे जिथे आंदोलन केले तिथे राष्ट्रवादी सोबत होती. स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांचा वापर कसा करायचा हे जरांगे पाटलांना चांगलंच माहित आहे. असं देखील बाबुराव वाळेकर म्हणाले आहेत. जरांगेंसोबत मी 17 ते 18 वर्षांपासून काम करत आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघडं करणार आहे असे बाबुराव वाळेकर म्हणाले.