Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण चांगले तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केली आहे. बीडच्या इशारा सभेमधून त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्याचबरोबर या उपोषणात तीन कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा बांधवांना मोठे आव्हान केले आहे. (Maratha Reservation )
याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मिळेल त्या वाहनाने साहित्य घेऊन मुंबईकडे या. असे आव्हान जरांगे पाटील यांनी केले आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्याचबरोबर हे आंदोलन खूप मोठे आहे. त्यामुळे कोणीही घरी राहू नये.. सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन या. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचा आहे. कारण हे शेवटचं आंदोलन असणार आहे. असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. त्याचबरोबर 144 लागू केल्यामुळे आम्ही 20 तारीख निश्चित केल्याचे देखील त्यांनी सांगितले.