Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत अजूनही कोणताच तोडगा निघालेला नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहीजा ठेवायचा नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती. आता त्यांच्या या टिकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. (Maratha Reservation)
“जर इथून पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा पण मराठा आरक्षणाबाबत काहीही बोलायचं नाही”, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अजित पवार यांना दिला आहे. आज अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर
त्याचबरोबर, पहिल्यापेक्षा या दौऱ्यामध्ये लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते मात्र या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवार निवृत्ती घेणार? निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य