Manoj Jarange Patil । सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या जिवलग मित्राने गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मी देखील जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालोय. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मात्र मी मनोज जरांगे याला पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे यांचे मित्र अजय महाराज बरासकर यांनी केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Tania Singh । ब्रेकिंग! प्रसिद्ध मॉडेलने केली आत्महत्या
मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेत अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याच्या मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलन पोहचलो. त्या रात्री देखील पुन्हा गुप्त मिटिंग केल्या. असं अजय महाराज बरासकर यांनी म्हंटल आहे.
Disqualification Matter । शरद पवार यांना सर्वात मोठा झटका? अजित पवार यांनी खेळली मोठी खेळी
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “अधिसूचनेत म्हटलं हे लागू १६ तारखेला होईल. मात्र तरीदेखील मनोज जरांगे याची इच्छा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं. जेसीबीतून फुलं हवीत कार्यक्रम हवेत. असं देखील अजय महाराज बरासकर यांनी म्हंटल आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Parbhani News । धक्कादायक बातमी! महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे 3 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू