Manoj Jarange Patil । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नऊ दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतली असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. त्यामुळे काहीही हरकत नाही, आम्ही त्यांना वेळ देऊ. ४० वर्षे वाट पाहिली अजून थोडा वेळ देऊ मात्र आरक्षणाच आंदोलन थांबणार नाही. तुम्ही वेळ घ्या पण आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी तूर्तास उपोषण सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर आम्ही सरकारला २ जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत असे देखील त्यांनी म्हटले आहे. निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या लिहून घेतल्या. मनोज जरांगे पाटील यांनी न्यायाधीशांकडे चार महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यानंतरच त्यांनी आपले उपोषण सोडले आहे.
त्या ४ मागण्या कोणत्या
१) मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं
२) आयोगाला सर्व्हेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावं
३) सुविधा आणि आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी
४) सर्व्हेक्षणासाठी एकापेक्षा अधिक संस्थानेमण्यात याव्यात, सर्व्हेक्षणासाठी चालढकल करण्यात येऊ नये, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
Arvind Kejriwal । मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अटक होणार?