
Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मागच्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. अशातच आपला पाचव्या टप्प्यातील दौरा कार्यक्रम आटपुन मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचार घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली पुढची रणनीती
मागच्या काही दिवसापासून नियमित दौरे सुरू असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालवली आहे. त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.
तब्येत बरी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पुढील दिशेची तयारी करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान आरक्षणासाठी संयम ठेवावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आव्हान केले जात आहे. संयमाच्या याच मुद्द्यावरून जरांगे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा आम्ही दिले. तुम्ही ३० दिवस मागितले तेव्हा आम्ही ४० दिवस दिले त्यामुळे संयम कसा असतो? साहेबांनी सांगावं असे ते म्हणाले आहेत.
Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केले मोठे वक्तव्य