Manoj Jarange Patil । मागच्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील धडपडत आहेत. अनेक दिवस उपोषणे केली सध्या गावागावात जाऊन सभा घेत आहेत. हे सर्व चालू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बातमी समोर आली आहे. (Manoj Jarange Patil’s health suddenly deteriorated)
धाराशिव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा संपताच त्यांना शुगर कमी असल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांची शुगर 76 वर पोहोचल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील पाच दिवस मनोज जरांगे पाटील यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
50MP कॅमेरा आणि 5400mAh बॅटरीसह Realme C67 5G या दिवशी होणार लॉन्च!
मनोज जरांगे पाटील यांची शुगर फार कमी झाली आहे. शुगर 76 वर पोहोचली आहे. सतत उपोषण आणि प्रवास सुरू असल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना आरामाची गरज असल्याचे देखील डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पुढील पाच दिवस आराम करावा लागणार अशी प्रतिक्रिया त्यांच्या चेकअप नंतर डॉक्टरांनी दिली आहे.
Big Accident । भीषण अपघात, ट्रक आणि पिकअपच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू