Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची मोठी फसवणूक? झोपेत असताना कागदपत्रांवर घेतली सही?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभर तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधव आता पेटून उठले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज लोणावळ्याला धडकला आहे. त्यांचा मोर्चा आज वाशी या ठिकाणी मुक्कामाला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र वाशी या ठिकाणी पोहोचण्याआधीच नवी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेऊन त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली.

Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…

महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कागदपत्रांवरील सहीचा विषय चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही कागदपत्रांवर सही केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सहीचा किस्सा सांगितला आहे.

Ram Ramdir । पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान, किती आले पैसे?

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “कोणीतरी आपल्याला गोड बोलून फसवणूक केली आणि सही नेली असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. संबंधित व्यक्तीने कोर्टाचे कागदपत्र असल्याचे म्हणून दोन कागदपत्रांवर सही केली मात्र तरीसुद्धा आपण आझाद मैदानातच उपोषणाला बसणार आहोत. अशी ठामपणे भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

Viral Video । दिल्लीत पाळीव कुत्रा झाला हिंसक, २ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला, पाहा भयानक व्हिडिओ

त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “त्याने झोपेच्या नादात माझी सही घेतली. सही घेणारा पोलीस होता की कोण होता माहित नाही. थांब तुझी आणि माझी पण भेट होईल. तू सही नेली असली तरी मी आंदोलनाला आझाद मैदानावरच बसणार आहे. पण तो जर टीव्हीवर हे ऐकत असेल तर तू अशी फसवणूक करू नको. माझ्याशी गोड बोलून सही नेली मी झोपेच्या नादात होतो. तो म्हणाले मी कोर्टाचा आहे म्हणून मी सही केली. अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

Social Media । सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने केले घृणास्पद कृत्य; वाचून व्हाल थक्क

Spread the love