Manoj Jarange Patil । मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेतले आणि महत्वाचे निर्देश दिले आहेत. “मराठासमाज मोठ्या सांख्येने मुंबईकडे रवाना झाला आहे. लोकांच्या गर्दीमुळे रोड ब्लॉक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची दखल घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले.
त्याचबरोबर “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही याची देखील माहिती पोलिसांनी त्यांना द्यावी”, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Private Jets | “बॉस सेक्स करत होता…”, एअर होस्टेसने प्रायव्हेट जेटबाबत केला अत्यंत धक्कादायक खुलासा
जरांगे पाटील म्हणाले, “ आम्हाला देखील न्यायालय न्याय देईल. न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. याप्रकरणी आमचे वकील कोर्टात जातील काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काहीच नाही. आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
Maratha Protest HC । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने स्वीकारली मराठा आंदोलनाविरोधातील याचिका