
Manoj Jarange Patil । मराठा समाजाचा सर्वात जास्त वाटोळं हे मराठा नेत्यांनीच केलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. आमच्या जीवावर निवडून आले केंद्रात त्याचबरोबर राज्यामध्ये मंत्री झाले. मुख्यमंत्रीपद देखील घेतलं मात्र आम्हाला साथ दिली नाही म्हणून आमचं वाटोळ झालं. आमच्या हक्काच आरक्षण देखील त्यांनीच घालवलं. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
त्याचबरोबर जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर सर्वांचीच नावे जाहीर करणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे. त्याचबरोबर कोण ओबीसी मध्ये वीस वर्षापासून आहे. आपला आरक्षण कोणी घालवलं? त्यांची नावे सर्वांसमोर मांडणार असल्याचे देखील जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी आज जालना या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Big Boss । बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या आणि नील एकमेकांशी भिडले
त्याचबरोबर या पत्रकार परिषदेतून त्यांनी मराठा नेते त्याचबरोबर ओबीसी नेत्यांवर देखील शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या सवलती आहेत. त्या सर्व सवलती त्यांना मिळत आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील मिळाव्या अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.
Accident News । सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात; १ जणाचा जागीच मृत्यू