Manoj Jarange Patil । मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा समाजाच्या (Maratha protest) मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारल्यानंतर रात्री अंतरवाली सराटीत पोहोचले. पण मराठा अध्यादेशाला ओबीसी (OBC) समाजाने विरोध केला आहे. या आरक्षणाचे पुढे काय होणार? हे येत्या काही दिवसात समजेल. (Latest marathi news)

Viral Video । एका सेकंदाचाही उशीर झाला असता, तर पिता-पुत्रांचा जीव गेला असता, पाहा अपघाताचा भयानक व्हिडीओ

यावर मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केले आहे. बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठ्यांचा सात बारा पक्का झाला आहे, (Maratha reservation) आता वळवळ करायची गरज नाही. कारण या पाच महिन्याच्या संघर्षाने समाजाला खूप काही दिले. सग्या सोयऱ्या याच शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. (Maratha reservation protest)

Pankaja Munde । पंकजा मुंडे यांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य, जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला; म्हणाल्या, “आता तुम्ही…”

पुढे ते म्हणाले की, “कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळणार आहे. सगे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे, हे अगोदरच मी हेरल होते. यामुळे अंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई मुंबईपर्यंत लांब जाईल, असे मला वाटले नव्हते. पण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या असल्याने मराठा समाजाला आता सक्रीय भूमिका घ्यावी लागेल,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा! ‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही

Spread the love