Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईपर्यंत मोर्चा काढला. यानंतर मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील अजूनही काही गोष्टींवर आक्रमक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना खडे बोल सुनावत जहरी टीका केली आहे.
Ajit Pawar । गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढी टोकाची मजल…”
“तू ओबीसींच वाटोळं केलं आहे. आम्ही ओबीसींच वाटोळं नाही होऊ देणार अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील असं धक्कादायक विधान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सध्या त्यांच्या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा देखील सुरू आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “तुझे वय झालं आहे आणि या वयात एवढा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाहीतर टपकनवर जाशील.. अशा शब्दात मनोज जरांगेपाटील यांनी भुजबळांना इशारा दिला आहे.