Manoj Jarange Patil । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या अमोल खुणे (Amol Khune) यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी ते माजलगाव रोडवर ही घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत खुणे यांच्या डोक्याला मार लागला असून ते रक्तबंबाळ झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी खुणे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. अमोल खुणे हे गेवराई या ठिकाणाहून आपल्या गावी रुई धानोरा येथे निघाले होते. यावेळी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गादीवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. ही दगडफेक नेमकी कशामुळे करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
Loksabha Elections । भाजपला मोठं खिंडार, मोहिते पाटलांनंतर बड्या नेत्याचा राजीनामा
६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिनिमीत्त माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. येत्या महिनाभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मी पुन्हा एकदा 6 जूनपासून उपोषणाला बसेन, असे ते म्हणाले. राज्य सरकारकडून आमची दिशाभूल करण्यात आली आहे. महायुतीने आम्हाला मराठा आरक्षण दिलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. असं ते म्हणाले आहेत.
Sharad Pawar । शरद पवारांचा भाजपाला पुन्हा मोठा धक्का, निष्ठावंत नेता करणार पक्षात प्रवेश