Site icon e लोकहित | Marathi News

Maratha Reservation । गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील

Manoj jarange patil strict warning to government

Maratha Reservation । छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमनेसामने आले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. अशातच आता मनोज जरांगेंनी इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Viral Video । गरुडाने रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीचा काढला डोळा, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

“मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा लढा (Maratha Reservation Protest) सुरू आहे. हे आंदोलन आता जनआंदोलन बनले असून ५४ लाख मराठ्यांना (Maratha) कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ मिळेल. परंतु, सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम आहे. आता त्यासाठीच मुंबईत (Mumbai) आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

AI म्हणजे नक्की काय भानगड आहे? जाणून घ्या, कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल काही खास गोष्टी!

पुढे ते म्हणाले की, “मागील पाच महिन्यापासून आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; पण सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे. गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एकदा अंतरवाली सराटी गाव सोडले की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. भविष्यात मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी सर्वांनी घराबाहेर पडावे,” असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.

Social Media । काय सांगता? येत्या २ वर्षात जगातील निम्मे यूजर्स सोशल मीडियाला ठोकणार रामराम; सर्वेक्षणात धक्कादायक माहिती उघड

Spread the love
Exit mobile version