
Manoj Jarange Patil | सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगलाच पेटून उठला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाव म्हणून ठीक ठिकाणी आंदोलन केले जात आहेत. दरम्यान जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे मागच्या पंधरा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसून देखील ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारकडून सतत विनंत्या करण्यात येत आहेत. (Manoj Jarange Patil)
सरकारने मराठा आरक्षणाबाबत एक जीआर देखील काढला आहे. मात्र या जीआर मध्ये जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असणाऱ्या नागरिकांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येईल असे म्हटले आहे. मात्र ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतील त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
त्यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारवरील दबाव वाढतच चालला आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा देखील दिसत आहे, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जवळपास तीन वेळा त्यांची भेट घेतली आहे आणि भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील केला आहे. यानंतर सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावत या विषयावर मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा केली.
Sambhaji Bhide । संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट! म्हणाले; “एकनाथ शिंदे लबाड…”
या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा असे एकमत झालं. त्यानंतर आज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या बांधवांशी याबाबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यांनी आपण उपोषण सोडलं तरी उपोषणस्थळी तळ ठोकून राहू. आंदोलन सुरूच राहील असं स्पष्ट केलं तसेच 12 ऑक्टोबरला मोठा मेळावा होईल असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे आता मनोज जरांगे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या लक्ष लागल आहे.