Maratha Reservation । काही तासांत संपणार मराठा आरक्षणाचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार? संपूर्ण राज्याचे लागले लक्ष

manoj-jarange-patil-ultimatum-to-shinde-fadnavis-pawar government

Maratha Reservation । मराठा समाज हा आरक्षणासाठी (Reservation) खूप आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याच मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो आज संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Crime News । धक्कादायक! ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होती देहविक्री, सापळा रचत पोलिसांनी केला पर्दाफाश

अल्टिमेटम संपण्यापूर्वी जरांगे पाटील आज बीडमध्ये (Beed Maratha Reservation) सभा घेणार आहे. मराठा समाजाच्या या सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली निघणार आहे. ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकात येईल, तिथून अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल.

Sunil Kedar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! माजी मंत्री सुनील केदार यांची तब्बेत बिघडली, रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅली बार्शी रोड मार्गे सभास्थळाकडे जाईल. तिथे मनोज जरांगे मराठा समाजाला संबोधित करणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सरकार (Government) मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.

Congress MLA Sunil Kedar । काँग्रेसला सर्वात मोठा झटका! बड्या नेत्याला ५ वर्षांचा तुरुंगवास

Spread the love