Maratha Reservation । मुंबई : सध्या मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) लढत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला सगळ्यात मोठे यश आले आहे. राज्य सरकारने मध्यरात्री अध्यादेश काढले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. (Latest marathi news)
सरकारने याबाबतचा जीआर शनिवारी रात्री तयार केला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नवीन जीआर सुपूर्द केला आहे. यात मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांचा समावेश आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत आहे, असे स्पष्ट केलं आहे.
यावेळी, मनोज जरांगे पाटील यांनी स्टेजवरुन एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती केली आहे. “साहेब, माझी मराठा समाजच्या वतीने एकच विनंती आहे, ज्या सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला आहे. ज्याची कुणबी नोंद मिळाली, जिवाची बाजी लावली म्हणून शरीर साथ देत नाही. मराठा समाजासाठी राजपत्र निघाल असून ज्याची कुणबी नोंद मिळाली आहे त्याच्या गणगोत्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका,” अशी विनंती जरांगे यांनी केली आहे.
Maratha Aarakshan । मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? पाहा संपूर्ण यादी