Manoj Jarange Patil । “…तेव्हा अजित पवारांच्या गळ्यात उडी मारणार”, जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजत आहे. आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असल्याने राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जोपर्यंत आरक्षण (Reservation) मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. सरकार त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहेत पण ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. (Latest marathi news)

OnePlus चा नवा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार, बजेट तयार करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा (Manoj Jarange Patil vs Government) दिला आहे. मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. याला आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आरक्षण घेऊन येऊ द्या. त्यांच्या गळ्यातच उडी मारतो. त्यांना सोडतच नाही आणि त्यांना आमच्याकडे यायला एसटीचं तिकीट काढून देतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या. मग मुस्लिम आणि धनगरांना देखील आरक्षण कसं मिळत नाहीत ते देखील बघतो”, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Ajit Pawar vs Manoj Jarange Patil)

Beed News । बंगल्यात सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी टाकली धाड; धक्कादायक माहिती समोर

पुढे ते म्हणाले की, “आमच्यासाठी दरवाजे कसे बंद करतात ते देखील मी बघतो. समजा आम्हाला मुंबईत आमरण उपोषणासाठी मैदानं दिले नाही तर ती सरकारची सगळ्यात मोठी नाचक्की असणार आहे. आमचं आंदोलन नियोजित आहे, त्यामुळे मला अयोध्येला जाता आले नाही. आमच्या आंदोलनातच रामप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करणार आहे,” असेदेखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Accident । स्टेजवर 6 मुली नाचत होत्या, क्षणात कोसळले स्टेज; पाहा अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love