Manoj jarange Patil । “…तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम

Manoj Jarange Patil

Manoj jarange Patil । मुंबईमध्ये (Mumbai) आज सकाळपासून मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी घडत आहेत. लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या सकाळपासून चर्चा सुरू होत्या. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचे देखील संकेत मिळाले आहेत. या सर्व चर्चानंतर जरांगे पाटील यांनी वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौकात (Chhatrapati Shivaji Chowk) जाहीर सभा केली यावेळी. त्यांनी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Ajit Pawar and Parth Pawar | पार्थ पवार यांची गजा मारणेबरोबर भेट, अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

पहा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

“पहिल्यांदा जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, सकाळी सरकारसोबत चर्चा झाली आहे. सरकारने त्यांची भूमिका आणि आपली ही भूमिका ऐकली. ५४ लाख ओबीसी नोंदी सापडल्या असतील तर त्याचे वाटप करा अशी आपली मागणी होती ज्या ५४ लाख नोंदी मिळाल्यात, त्यांचे वाटप होईल,” असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Maratha Reservation । सरकारकडून सर्व मागण्य मान्य? जरांगे पाटील २ वाजता मोठी घोषणा करणार

त्याचबरोबर, आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. याबाबत गुन्हे मागे घेण्यासाठी निर्देश दिले आहेत असे सरकारने म्हटले आहे. मात्र त्याचे पत्र दिले नाही अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Maratha Reservation । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य? जरांगे पाटील वाचून दाखवणार जीआर

Spread the love