Manoj Jarange Patil । शेतकऱ्याने चक्क बैलाच्या अंगावर रेखाटले मनोज जरांगे पाटलांचे चित्र; गावभर काढली मिरवणूक

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी जवळपास 17 दिवस उपोषण केले. त्यामुळे सध्या आता त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. नुकतच काल मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत त्यांनी उपोषण सोडलं आहे.

Maharastra Politics । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? अजित पवार की शरद पवार? समोर आली मोठी अपडेट

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यावर एका गावात चक्क बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे आणि या बैलाची संपूर्ण गावांमधून मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारी यंत्रणा हलवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे.

Accident News । बैलाला अंघोळ घालण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धाराशिव मधील दहिफळ या गावांमध्ये बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. विविध रंगांच्या साह्याने बैलाच्या अंगावर जरांगे पाटील यांचे चित्र काढण्यात आले आहे. गावातून वाजत गाजत या बैलाची मिरवणूक करण्यात आली आणि या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Breaking News । मुंबई विमानतळावर विमान क्रॅश, लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे

Spread the love