Manoj Jarange । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आज झालेल्या भाषणामध्ये बोलल्याप्रमाणे ते आता आंदोलन स्थळावरून मुंबईमधील देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज देवेंद्र फडणीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Manoj Jarange । मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!
मागच्या 15 ते 16 दिवसापासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली दिसत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील चालत न जाता गाडीमध्ये बसले आहेत. मराठा बांधवांचा मोठा जमाव देखील त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहे. रात्रीपासून त्यांनी पाणीही घेतलेलं नाही.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या या अचानक भूमिकेमुळे सरकार काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सलाईन मधून मला विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीस यांचा डाव होता. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Yavatmal News । पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला