
Manoj Jarange Patil । मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देत आहेत. नुकत्याच मराठा समाजाच्या मागण्या (Reservation protest) राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आज आंदोलनाला यश मिळाल्यानंतर किल्ले रायगडावर जरांगे पाटील आशिर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Latest marathi news)
Accident News । धक्कादायक! कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू
बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठ्यांचा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न असून आता हा प्रश्न सुटला की, धनगर (Dhangar reservation) आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण (Muslim reservation) कसं देत नाहीत तेच बघतो. त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यासाठी त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटावा. आरक्षणाबाबत धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange । ‘…तर OBC आरक्षणच रद्द होईल’! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला विरोध केला आहे. त्यावरून जरांगे पाटील देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट ओबीसी (OBC) आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.