
Manoj Jarange Patil । मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी कडवी टीका केली होती. आज याचे तीव्र पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest marathi news)
Devendra Fadnavis । बिग ब्रेकिंग! जरांगे पाटलांच्या मागे कोणाचा हात? सर्व गोष्टी येऊ लागल्या बाहेर
“मी मराठा समाजाचे काम करत आहे. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच अडकू शकत नाही. कारण मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. मला तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. आता म्हणाले तरीही मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
फेस कॉलवर काय बोललेत हे देखील मी पण उघड करतो, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, “रात्री जाऊन जरांगे पाटलांना परत आणणारे कोण आहेत? कोणाकडे बैठक झाली? हे आरोपी सांगत आहेत. आम्हाला दगडफेक करा, असे आरोपीने जबाबात सांगितले आहे. ज्या पोलिसांवर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाईल,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसचा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश