Manoj Jarange Patil । मराठा समाज ओबीसींमधून आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी (Maratha reservation protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा जरांगेंनी घेतला आहे. अशातच आता जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)
जरी राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण (Maratha reservation) जाहीर केलं असलं तरी, सगेसोयऱ्याची ९ मार्चपर्यंत अंमलबजावणी करा ही मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी सगेसोयरेबाबत अंमलबजावणी केलीच पाहिजे. 2012 च्या कायद्यात दुरुस्ती करून आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी अगोदर करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
“सगेसोयचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही. समाजाला आडवी चालण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार नाहीत. नाहीतर मराठा समाजाच्या रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री शिंदे एकनाथ समाजाच्या मनातून उतरले तर पुढच्या पायऱ्या चढणे अवघड आहे . निष्पाप लोकांना गुंतवले जात आहे,” असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.