मानसी नाईक ( Mansi Naik) ही मराठी पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री आहे. अनेक गाण्यांमधून व चित्रपटांमधून चाहत्यांना वेड लावणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मागील काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यातील घटनांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मानसीच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी सुरू झाल्या असल्याची माहिती सध्या समोर येतीये.
ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या मृत्यूची बातमी खोटी; पत्नीने दिली खरी माहिती
काही दिवसांपूर्वी मानसीने तिचा नवरा म्हणजेच प्रदीप खरेरा (Pradip Kharera) याचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरून डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर प्रदीपने देखील त्याच्या सोशल मीडिया हँडल्स वरून मानसीचे फोटो डिलीट केले आहेत. याशिवाय मानसीने तिच्या नावासमोरील खरेरा हे आडनाव सुद्धा हटवले आहे. यामुळे मानसी प्रदिपसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना अक्षरशः उत आला आहे. मात्र आता मानसी नाईकने पती प्रदीप खरेराबरोबर घटस्फोट घेत असल्याचं उघड केलं आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासन देखील शांत
मानसीचा नवरा प्रदीप सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. दरम्यान, मागच्या काही महिन्यांपूर्वी तर त्याने चक्क न्यूड फोटो शूट केलं होतं. ते फोटो त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर देखील केले होते. त्याच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू होती.या फोटोंमध्ये त्याने फक्त अंतर्वस्त्र परिधान केले तर काही फोटोंमध्ये फक्त टॉवेल गुंडाळून विविध पोझ दिल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या न्यूड फोटो व्यतिरिक्त त्याचे शर्टलेस फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पशुसेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न; औरंगाबाद सिटी कॅनन क्लब चे उद्घाटन