
Politics News । भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा एक मोठं भाकीत केलं आहे . विशेष म्हणजे त्यांनी या आधी देखील भाकीत केलं आहे. मागच्या वेळी गिरीश महाजन यांनी भाकीत केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये तर, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान गिरीश महाजन यांनी पुन्हा एका नवीन भाकीत केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Eknath Khadse । “तेव्हा मी भाजपात जाईल…” एकनाथ खडसे यांचे सर्वात मोठे वक्तव्य
“मी याच्याआधी देखील सांगितलं होतं. माझ्या संपर्कात काँग्रेसमधील अनेक नेते आहेत. अनेक भूकंप होतील. त्यापैकीच अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी कॉग्रेसची साथ सोडत इतर पक्षामध्ये प्रवेश केला. ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील”, असं मोठं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.
Vasant More । ब्रेकिंग! राजीमाना देऊन काही तासात होताच वसंत मोरेंना अजित पवार गटाकडून खुली ऑफर
आज जे टीका करत आहेत तेच लोक उद्या भाजपमध्ये येतील. मी सर्वांची नावे घेत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची रॅली जशीजशी मुंबईत शिवाजी पार्क येथे येईल तसे अनेक धक्के त्यांना बसतील”, असा मोठा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे.
Ajit Pawar । “बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल”, अजित पवार गटाचा शिंदे गटाला थेट इशारा